Showing posts with label प्रणयगीत. Show all posts
Showing posts with label प्रणयगीत. Show all posts

Monday, March 28, 2016

जीव पिसाटला - परतू


( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
वेड लावे जीवाला बघुनी तुला
पास असुनी तुझी आस लागे मला
एक क्षणही नकोसा दुरावा तुझा
श्वास माझा म्हणू की पुरावा तुझा
काय होणार माझे कळे ना मला
प्रेम छळते किती हे मला तुला
जीव पिसाटला पिसाटला रामा
बोलणे हे तुझे की फुलांचा सडा
हासता किणकिणे चांदण्यांचा चुडा
एवढासाच शृंगार पुरतो तुला
दृष्ट लागो न माझीच माझ्या फुला
जीव पिसाटला पिसाटला रामा
तूच तू सोबती तूच दाही दिशा
ध्यास हि तूच नि तूच माझी नशा
सावली तू कधी तू उन्हाच्या झळा
सांग डोळ्यात लपवू कसा मी तुला
रंग झालो तुझा रंगता रंगता
आग पाणी जणू एक झाले आता
जीव पिसाटला पिसाटला रामा


गायक - जसराज जोशी 
चित्रपट - परतू 
संगीत - शशांक पवार 
गीत - वैभव जोशी 

Singer: Jasraj Joshi
Movie: Partu
Music: Shashank Powar
Lyrics: Vaibhav Joshi






( Jeev pisatla - Partu - Jasraaj Joshi)

Tuesday, March 1, 2016

ओल्या सांजवेळी - प्रेमाची गोष्ट


( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी  ये जरा

कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी  जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील  या नव्या वाटेवरी तुझ्या

रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत  तुझी साथ दे

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : बेला शेंडे - स्वप्नील बांदोडकर
संगीत : अविनाश - विश्वजित 
चित्रपट : प्रेमाची गोष्ट 
Lyrics : Ashwini Shende
Singer : Bela Shende - Swapnil Bandodkar 
Music: Avinash - Vishwajeet  
Movie : Premachi Goshta


( Olya Sanjweli  -  Premachi Goshta)

Sunday, February 28, 2016

टिक टिक वाजते डोक्यात - दुनियादारी


( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात

नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने 
सोचू तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने 
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात 
टिक टिक वाजते ..


सूर ही तू, ताल ही तू 
रुठे जो चांद वो नूर है तू 
आसु ही तू हसू ही तू 
ओढ मनाची नि हूरहुर तू 
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात 
टिक टिक वाजते ..

गीतकार : मंगेश कांगणे 
संगीतकार : पंकज पडघन 
गायक : सोनू निगम - सायली पंकज
चित्रपट : दुनियादारी 
 Lyricist : Mangesh kangane 
Music Director : Pankaj Padghan 
Singer : Sonu Nigam ,Sayali Pankaj 
Movie : Duniyadari



( Tik Tik wajate Dokyat - Duniadari )

Saturday, February 27, 2016

मला वेड लागले प्रेमाचे - गुरु ठाकूर


( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा 
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा 
हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे 
का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे 
मला वेड लागले प्रेमाचे 

नादावला, धुंदावला, कधी गुंतला जीव बावरा
नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा 
मला वेड लागले प्रेमाचे 

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटले माझे मला 
खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा 
मला वेड लागले प्रेमाचे 

गीतकार : गुरु ठाकूर
संगीतकार : चिनार - महेश
गायक : स्वप्नील बांदोडकर
चित्रपट : टाईमपास
Lyricist : Guru Thakur
Music Director : Chinar - Mahesh,
Singer : Swapnil Bandokar
Album/Movie : Timepass



( Mala ved lagle Premache - Guru Thakur )

Friday, February 26, 2016

तू गेल्यावर असे हरवले सुर - शांताराम नांदगावकर


( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
तू गेल्यावर …(२)
असे हरवले सुर
हरवले गाणे
वेलीवरचे फूल ठिबकले
हळवे दर्द दिवाणे
हरवले गाणे …(३) || ध्रु ||

शब्दांचा संभार आटला
गीतातुन अंधार दाटला …(२)
पाण्यावर थरथरले अवचित
मार्दव अश्रु तराणे || १ ||

हरवले गाणे …(३)

गायिका : अनुराधा पौडवाल
गायक : सुरेश वाडकर
गीत : शांताराम नांदगावकर

संगीत : अरुण पौडवाल


( Tu Gelyawar ase harawale sur - Shantaram Nandgaokar - Singer Suresh wadkar)

Saturday, March 17, 2012

स्वप्नात साजणा - जगदीश खेबुडकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
स्वप्नात साजणा येशील का ?
चित्रात रंग हे भरशील का ?

मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चिंब भिजावे
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का ?

स्वप्नात साजणा येशील का ?

ही धूंद प्रीतीची बाग, प्रणयाला आली जाग
रोमांचित गोरे अंग, विळख्यात रेशमी धरशील का ?

स्वप्नात साजणा येशील का ?

प्रतिमेचे चुंबन घेता, जणू स्वर्गच येई हाता
मधुमिलन होता होता, देहात भरून तू उरशील का ?

स्वप्नात साजणा येशील का ?


गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - विश्वनाथ मोरे
स्वर - आशा भोसले
चित्रपट - गोंधळात गोंधळ




( Swapnat Sajana Yeshil ka - Jagadish Khebudkar)

Thursday, February 16, 2012

कधी तू - श्रीरंग गोडबोले

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू
- कोसळत्या धारा
- थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
- सळसळत्या लाटा
-भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओलीरात

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी
रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात


चित्रपट : मुंबई पुणे मुंबई
दिग्दर्शक : सतीश राजवाडे
संगीतकार : अविनाश-विश्वजीत
गीतकार : श्रीरंग गोडबोले




( Kadhi Tu Rimzim zarnaari barasat - Shrirang godbole )

Friday, September 9, 2011

कसे सरतील सये - संदीप खरे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे ?
सरताना आणि सांग सलतील ना !
गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना ! .....

पावसाच्या धारा धारा ..... मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे .....
ओठभर हसे हसे..... उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे ?
आता जरा अळिमिळी
तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना ! .....

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचूप ..... सुनसान दिवा !
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा !!
चांदण्याचे कोटी कण
आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना ! .....

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर ..... काचभर तडा !
तूच तूच ..... तुझ्या तुझ्या ..... तुझी तुझी ..... तुझे तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा !! -
पडे माझ्या वाटेतून
आणि मग काट्यातून
- जातानाही पायभर मखमल ना ! .....

आता नाही बोलायाचे ..... जरा जरा जगायाचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत ..... विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले !!
जरा घन झुरू दे ना
वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! .....

गीत : संदीप खरे संगीत : संदीप खरे स्वर : संदीप खरे

Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Kase sartil saye - Sandip Khare )

Wednesday, August 3, 2011

प्रेमा, काय देऊ तुला ? - पी. सावळाराम

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
प्रेमा, काय देऊ तुला ?
भाग्य दिले तू मला

प्रीतीच्या या पाखराचे रत्‍नकांचनी पंख देऊ का
देऊ तुला का हर्षगंध हा जीव फुलातून मोहरलेला

या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढ ती तुला हवी का
रूप मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला

मोहक सुंदर जे जे दिसते, तूच तयांचा जन्मदाता
घेशील का रे माझ्याकरिता अधरीच्या या अमृताला

गीत : पी. सावळाराम
संगीत : वसंत प्रभू
स्वर : लता मंगेशकर




( Prema Kaay deu tula, bhagya dile tu mala - P Sawalaraam )

Tuesday, July 5, 2011

तरुण आहे रात्र अजुनी - सुरेश भट

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे... आणि तू मिटलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?

उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा
तू किनाऱ्यासारखा पण कोरडा उरलास का रे?

ओठ अजुनी बंद का रे? श्वास ही मधुमंद का रे?
बोल, शेजेच्या फुलांवर तू असा रुसलास का रे?

गीत : सुरेश भट
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले


Get this widget | Track details | eSnips Social DNA

स्वर : आशा भोसले


स्वर : आरती अंकलीकर-टिकेकर


( Tarun aahe Ratra Ajuni - Suresh Bhat )

Monday, July 4, 2011

धुंद मधुमती - ग. दि. माडगूळकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
धुंद मधुमती रात रे, नाथ रे,
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा, नाथ रे, नाथ रे

जल लहरी या धीट धावती
हरित तटांचे ओठ चुंबिती
येइ प्रियकरा, येइ मंदिरा
अलि रमले कमलात रे, नाथ रे

ये रे ये का मग दूर उभा ?
ही घटिकाहि निसटुन जायची
फुलतील लाखो तारा,
परि ही रात कधि कधि ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनि
कटीभंवती धरि हात रे, नाथ रे

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : मा. कृष्णराव
स्वर : लता मंगेशकर


Get this widget | Track details | eSnips Social DNA


( Dhund Madhumati raat re - Ga Di Madgulkar )

Tuesday, June 28, 2011

जेव्हा तिची नि माझी - मंगेश पाडगावकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली

दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन्‌ पालखी निघाली

केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली

नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
स्वर : अरुण दाते


Get this widget | Track details | eSnips Social DNA

( Javha tichi ni majhi chorun bhat jhali - Mangesh Padgaokar )

जिवलगा, कधि रे येशील तू ? - ग. दि. मा

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू ?

धरेस भिजवुन गेल्या धारा
फुलून जाइचा सुके फुलवरा
नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?

शारदशोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?

हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?

पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभि पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : सुधीर फडके
स्वर : आशा भोसले


Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Jivalaga kadhi re yeshil tu - Ga Di Madgulkar)

Monday, June 20, 2011

कुणि जाल का, सांगाल का - अनिल

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
फार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला

सांभाळुनी माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पावले
सांगाल का त्या कोकिळा, की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली

गीत : आ. रा. देशपांडे ’अनिल’
संगीत : यशवंत देव
स्वर : पं. वसंतराव देशपांडे


Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Kuni Jaal ka sangal ka , suchawal ka tya kokila - Anil )

Saturday, June 18, 2011

गा गीत तू सतारी - शांताराम नांदगावकर

( ऑडीओ सहित )
गा गीत तू सतारी, गा गीत आसवांचे
या जीवनात वेडे, नाही कुणी कुणाचे

किती रंग गंध हळवे, फुलती भल्या पहाटे
होता दुपार विरती, निमिषात सांज दाटे
काळोख पीत येती, स्वर मंद काजव्याचे
या जीवनात वेडे, नाही कुणी कुणाचे

पंखात ऊब घेते, पिल्लू मुक्या खगाचे
चोचीत गोड दाणा घेण्यास जीव नाचे
पिल्लास पंख फुटता, घर शून्य पाखराचे
या जीवनात वेडे, नाही कुणी कुणाचे

टाक्यापरी सुईच्या स्वर आर्त छेदणारे
ते सांधती मनाचे आभाळ फाटणारे
गाण्यापरी जिण्याला, आकार भावनांचे
या जीवनात वेडे, नाही कुणी कुणाचे

गीत : शांताराम नांदगावकर
संगीत : अशोक पत्की
स्वर : राणी वर्मा


Get this widget | Track details | eSnips Social DNA

( Ga geet tu satari , ga geet asawanche - Shantaram Nandgaokar )

Thursday, June 16, 2011

असेन मी, नसेन मी - शान्‍ता शेळके

( ऑडीओ सहित )
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे

हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ?
निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

गीत : शान्‍ता शेळके
संगीत : यशवंत देव
स्वर : अरुण दाते


Get this widget | Track details | eSnips Social DNA

( Asen mi nasen mi, tari asel geet he - Shanta Shelke )

Tuesday, June 14, 2011

भेट तुझी माझी स्मरते - मंगेश पाडगांवकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

गीत : मंगेश पाडगांवकर
गायक : अरुण दाते
संगीत : यशवंत देव


Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Bhet tujhi majhi smarate , ajun tya disanchi , Dhund wadalachi hoti , Ratra pawasachi - Mangesh Padgaokar )