गा गीत तू सतारी, गा गीत आसवांचे
या जीवनात वेडे, नाही कुणी कुणाचे
किती रंग गंध हळवे, फुलती भल्या पहाटे
होता दुपार विरती, निमिषात सांज दाटे
काळोख पीत येती, स्वर मंद काजव्याचे
या जीवनात वेडे, नाही कुणी कुणाचे
पंखात ऊब घेते, पिल्लू मुक्या खगाचे
चोचीत गोड दाणा घेण्यास जीव नाचे
पिल्लास पंख फुटता, घर शून्य पाखराचे
या जीवनात वेडे, नाही कुणी कुणाचे
टाक्यापरी सुईच्या स्वर आर्त छेदणारे
ते सांधती मनाचे आभाळ फाटणारे
गाण्यापरी जिण्याला, आकार भावनांचे
या जीवनात वेडे, नाही कुणी कुणाचे
गीत : शांताराम नांदगावकर
संगीत : अशोक पत्की
स्वर : राणी वर्मा
|
( Ga geet tu satari , ga geet asawanche - Shantaram Nandgaokar )
हे गाणे ऐकल्यानंतर 'तू जहां जहां चलेगा' ची आठवण झाली.
ReplyDelete@Sharaddha - Agadi matala bolalis. Mi suddha mazyko la hech mhatla :)
ReplyDelete