Showing posts with label वि. दा. सावरकर. Show all posts
Showing posts with label वि. दा. सावरकर. Show all posts

Wednesday, February 24, 2010

सागरा प्राण तळमळला - वि. दा. सावरकर

ऒडीओ - व्हीडीओ
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धूतां
मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊं
सृष्टिची विविधता पाहूं
तइं जननीहृद् विरहशंकितही झाले
परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनीं मी
जगदनुभवयोगें बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणीं मी
येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला
सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥