( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
धुंद मधुमती रात रे, नाथ रे,
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा, नाथ रे, नाथ रे
जल लहरी या धीट धावती
हरित तटांचे ओठ चुंबिती
येइ प्रियकरा, येइ मंदिरा
अलि रमले कमलात रे, नाथ रे
ये रे ये का मग दूर उभा ?
ही घटिकाहि निसटुन जायची
फुलतील लाखो तारा,
परि ही रात कधि कधि ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनि
कटीभंवती धरि हात रे, नाथ रे गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : मा. कृष्णराव
स्वर : लता मंगेशकर
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होउं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा गीत : ग. दि. माडगूळकर ( गीतरामायण )
संगीत : सुधीर फडके
स्वर : सुधीर फडके
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू ?
धरेस भिजवुन गेल्या धारा
फुलून जाइचा सुके फुलवरा
नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?
शारदशोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?
पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभि पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ? गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : सुधीर फडके
स्वर : आशा भोसले
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
राजहंस सांगतो कितीर्च्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
पाहिले तुला न मी, तरी ही नित्य पाहते
लाजूनी मनोमनी, उगीच धूंद राहते
ठावूक न मजसी जरी निषध देश कोणता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
दिवस रात्र ओढणी, या मनास लागते
तुझीच जाहल्या परी, मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते, तुझी अमोल योग्यता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नाद चित्र रेखितो, तुझेच मंद कुजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागूता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता गीत : ग. दि. माडगुळकर
गायक : आशा भोसले
संगीत : सुधीर फडके
चित्रपट : सुवासिनी
वसंतकाली वनी दिनांती
एकच पुशिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा, हाती घेशील का ?
माझा होशिल का ?
नसेल माहित तुला कधी ते
रोज तुझ्या मी स्वप्नी येते
त्या स्वप्नांच्या आठवणी या, ओठां देशिल का ?
माझा होशिल का ?
दूर तू तरी जवळ तुझ्या मी
नाव गुंतवीत तुझिया नामी
मी येता पण सलज्ज जवळी, जवळी घेशिल का ?
माझा होशिल का ? गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : सुधीर फडके
स्वर : आशा भोसले
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
निजरूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो
अवरुद्ध साद माझा प्रतिसाद त्यास द्या हो
आला गजेंद्र मोक्षा तैसे पुनश्च या हो
जळत्या निळ्या वीजेची प्रभू एक झेप घ्या हो
निजरूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो
नरसिंव्ह होवुनीया घुमवीत गर्जनासी
शतसूर्य तेज दावा अज्ञात या जनासी
भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र व्हा हो
निजरूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो
पार्थास दाविले ते प्रभू विश्वरूप दावा
मुरली मनोहरा या व्हा वाजवीत पावा
एका करांगुलीने गोवर्धना धरा हो
निजरूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो
राज:भ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार
श्रीकृष्ण-विष्णू-राम तोचि विठु महार
जाळी तनामनासी ती आग शांतवा हो
निजरूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : सुधीर फडके
स्वर : सुधीर फडके
( व्हीडीओ सहित )
कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम !
एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ
राजा घनःश्याम !
दास रामनामी रंगे, राम होइ दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनःश्याम !
विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम
ठायि ठायि शेल्यावरती, दिसे रामनाम
गुप्त होई राम !
हळु हळु उघडी डोळे, पाहि जो कबीर
विणूनिया शेला गेला, सखा रघुवीर
कुठे म्हणे राम ? गीत : ग दी माडगुळकर
संगीत: पू ल देशपांडे
स्वर : माणिक वर्मा ( Kabirache vinato shele kausalyecha raam - Ga Di Madgulkar )
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥ धृ. ॥
माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ १ ॥
घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ॥ २ ॥
तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥ ३ ॥ गीत – ग. दि. माडगुळकर
गायक – सुधीर फडके
संगीत - सुधीर फडके ( Vitthala Tu veda Kumbhar - Ga D Madgulkar )
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
का रे दुरावा, का रे अबोला
अपराध माझा, असा काय झाला
नीज येत नाहि, मला एकटिला
कुणि न विचारि, धरि हनुवटीला
मान वळविशी तु, वेगळ्या दिशेला
अपराध माझा, असा काय झाला
तुझ्या वाचुनि ही, रात जात नाही
जवळी जरा ये, हळु बोल काही
हात चांदण्यांचा, घेई उशाला
अपराध माझा, असा काय झाला
रात जागवावी नाही, असे आज वाटे
तृप्त झोप यावी, पहाटे पहाटे
नको जगणे हे, नको स्वप्नमाला
अपराध माझा, असा काय झाला गीत : ग.दि. माडगुळकर
संगीत : सुधीर फडके
गायिका : आशा भोसले ( Kaa re durawa , ka re abola - aparadh maza asa kaay zala - Ga Di Madgulkar )
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
चढाओढीने चढवीत होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
होता झकास सुटला वारा
वर पतंग अकरा-बारा
एकमेकांना अडवित होते
बाई मी पतंग उडवीत होते
काटाकाटीस आला ग रंग
हसू फेसाळ घुसळीत अंग
दैव हारजीत घडवीत होते
बाई मी पतंग उडवीत होते
माझ्या दो-यानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
गेला गुंतत गिरवीत गोते
बाई मी पतंग उडवीत होते गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
गायक - आशा भोसले (Bai mi patang udavit hote - ga. di. madgulkar )
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माशा मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही
पिसे, तनसडी, काड्या जमवी, चिमणे बांधी कोटे
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखामधले, पिल्लू उडुनि जाई
रक्तही जेथे सूड साधते, तेथे कसली माया
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही
माणुस करतो प्रेम स्वतःवर, विसरुन जातो देवा
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन् सद्भावा
कोण कुणाचा कशास होतो या जगती उतराई गायक - सुधीर फडके
संगीत - श्रीनिवास खळे
गीत - ग. दि. माडगूळकर ( lala jivhala shabdach khote - Ga Di Madgulkar )