Showing posts with label सुधीर मोघे. Show all posts
Showing posts with label सुधीर मोघे. Show all posts

Thursday, April 14, 2011

विसरु नको श्रीरामा मला - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
विसरु नको श्रीरामा मला
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया

किती जन्म झाले, तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले, घेऊनी हिंडले सतीचा वसा, प्रिया

तू सांब भोळा, उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते आपुले वेगळे, जुळे श्यामला, प्रिया

गीत :सुधीर मोघे
गायक :लता मंगेशकर
संगीत :पं. हृदयनाथ मंगेशकर






( Visaru nako Shrirama mala - Sudhir Moghe )

Sunday, March 20, 2011

एक झोका, चुके काळजाचा ठोका - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
एक झोका, चुके काळजाचा ठोका ll धृ. ll
उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका ll १ ll
नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका ll २ ll
जमिनीला ओढायचें
आकाशाला जोडायचें
खूप मजा, थोडा धोका ll 3 ll

गायक: आशा भोसले
संगीत: आनंद मोडक
गीत: सुधीर मोघे






( Ek Zoka chuke kalajacha thoka , ek zoka - Sudhir Moghe )

Tuesday, March 8, 2011

दिसलीस तू, फुलले ऋतू - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
दिसलीस तू, फुलले ऋतू
उजळीत आशा, हसलीस तू ॥ ध्रु ॥

उरले न आसू, विरल्या व्यथाही
सुख होउनीया, आलीस तू ॥ १ ॥

जाळीत होते, मज चांदणे हे
ते अमृताचे, केलेस तू ॥ २ ॥

मौनातुनी ये, गाणे दिवाणे
त्याचा अनामी, स्वरभास तू ॥ ३ ॥

जन्मांत लाभे, क्षण एकदा हा
ते भाग्य माझे, झालीस तू ॥ ४ ॥

गायक: सुधीर फडके
संगीत: राम फाटक
गीत: सुधीर मोघे






( Disalis Tu Fulale Rutu - Sudhir Moghe )

Thursday, February 24, 2011

फिरुनी नवी जन्मेन मी - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला प्रथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना व्यथा
ना बंधने नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी

आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी, या वाहणार्‍या गाण्यातूनी
लहरेन मी, बहरेन मी शिशीरातूनी उगवेन मी

गीत - सुधीर मोघे
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले






( Ekach ya janmi janu firuni nav janmen mi - )

Monday, February 14, 2011

सांज ये गोकुळी - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
सांज ये गोकुळी, सावळी सावळी.
सावळ्याची जणु, सावली..

धुळ ऊडवीत गाई निघाल्या
शाम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्या सवे
पाखरांचे थवे
पैलघंटा घुमे राउळी
सांज ये गोकुळी..

पर्वतांची दिसे दुर रांग
काजळाची जणु दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली
सांज ये गोकुळी...

माउली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणु होई कान्हा
मंद वार्‍यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणु ओंजळी.
सांज ये गोकुळी...

गीत - सुधीर मोघे
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आशा भोसले






( Sanj ye Gokuli Sawali Sawali - Sudhir Moghe)

Friday, January 21, 2011

सखी मंद झाल्या तारका - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?

मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ?

हृदयात आहे प्रीत अन ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ?

जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ?

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का ?

गीत - सुधीर मोघे
संगीत - राम फाटक
स्वर - सुधीर फडके






( Sakhi Mand Zalya taraka - Sudhir Moghe )

Wednesday, May 19, 2010

फिटे अंधाराचे जाळे - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापुर्वीचे पालटे जग उदास उदास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

गायक - श्रीधर फडके



( Fite andharache jale, zale mokale akash )

Tuesday, April 20, 2010

दयाघना - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
दयाघना, का तुटले चिमणे घरटे
उरलो बंदी असा मी

अरे जन्म बंदीवास, सजा इथे प्रत्येकास
चुके ना कुणास, आता बंदी तुझा मी

दहा दिशांची कोठडी, मोहमाया झाली वेडी
प्राण माझे ओढी, झालो बंदी असा मी

बालपण ऊतू गेले अन तारुण्य नासले
वार्धक्य साचले, उरलो बंदी तूझा मी


( Dayaghana , ka tutale , chimane gharate )

Tuesday, March 23, 2010

तपत्या झळा उन्हाच्या - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो
मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो

वैराण माळ उघडा बेचैन तळमळे
मी दान आसवांचे फेकीत चाललो

आव्हेरुनी फुलांची अनिवार आर्जवे
काटेकुटे विखारी वेचित चाललो

दाही दिशांत वेडा वैशाख मातला
मी बाण चंदनाचे पेरीत चाललो

ये कोरड्या गळ्यात हा सूर कोठला
मी तार वेदनेची छेडित चाललो