Showing posts with label ना.घ. देशपांडे. Show all posts
Showing posts with label ना.घ. देशपांडे. Show all posts

Sunday, December 26, 2010

समाधी - ना.घ. देशपांडे

या दूरच्या दूर ओसाड जागी कीडे पाखारांवीन नाही कुणी
हा भूमिचा भाग आहे अभागी इथे एक आहे समाधी जुनी

विध्वंसली काल हस्तांमुळे हिला या पहा जागोजागी फटा
माती खड़े आणि आहेत काही हिच्या भोवती भंगलेल्या विटा

आहे जरी लेख हा छेद गेला जुन्या अक्षरातील रेघांमधुन
दुर्वांकुरे अन तरु खुंटलेला निघाला थरातील भेगांमधुन

कोठून ताजी फुले बाभळीनी हिला वाहिले फ़क्त काटे कूटे
ही भंगलेली शलाका पुराणी कुणाचे तरी नाव आहे इथे

रानातला उन मंदावलेला उदासीन वारा इथे वाहतो
फांदितला कावळा कावलेला भुकेलाच इथे तेथे पाहतो

( Samadhi - N G Deshpande )