Showing posts with label बालगीत. Show all posts
Showing posts with label बालगीत. Show all posts

Friday, July 1, 2011

अग्गोबाई ढग्गोबाई - संदीप खरे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव

गीत : संदीप खरे
संगीत : सलिल कुळकर्णी
स्वर : सलिल कुळकर्णी / संदीप खरे


Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Aggobai Dhaggobai lagali kal - Sandip Khare )

Monday, March 21, 2011

मी पप्पाचा ढापून फोन - संदीप खरे

( ऑडीओ सहित )
मी पप्पाचा ढापून फोन,फोन केले एकशे दोन !
हॅलो हॅलो बोलतय कोणं ? हॅलो हॅलो बोलतय कोणं?
हॅल्लो बोलतंय कोण ??
ए हॅलो…!!

आमचे नाव घेलाशेट, डोंगरा‌एवढे आमचे पेट
विकत बशतो शाजूक तूप, शाला चापून खातो आम्हीच खूप…
तुम्ही कोण काय तुमचं नाव,बोला झटपट तुमचा गाव..!!
कसलं नाव, नि कसला गाव…राँग नंबर लागला राव..!

लक्षुमबा‌ई मी जोश्याघरची, चोरून खाते अंडा-बुर्जी
वरती कपभर दूध अन्‌ साय,घरात आत्ता कोनी न्हाय…
तुम्ही कोण काय तुमचं नाव,बोला झटपट तुमचा गाव..!!
कसलं नाव, नि कसला गाव…राँग नंबर लागला राव..!

आमचे नाव आई-पप्पाय , चोळत बसतो दुखरा पाय
पालक खाईन गड्या चार , नंतर देईन खरपूस मार
तुम्ही कोण काय तुमचं नाव,सांगा झटपट सांगा राव..!!
कसलं नाव, नि कसला गाव…राँग नंबर लागला राव..!

मी तर आहे अट्टल चोर , चंद्राची मी चोरून कोर
झालो आता रात्र पसार , तारे उरले फक्‍त हजार
तुम्ही कोण काय तुमचं नाव,बोला झटपट तुमचा गाव..!!
कसलं नाव, नि कसला गाव…राँग नंबर लागला राव..!

हॅलो…
ढगामधून बोलतोय बाप्पा…चल,चल मारू थोड्या गप्पा…
बाप्पा बोलतोयस तर मग थांब,सगळ्यात आधी येवढं सांग
कालंच होता सांगत पप्पा,तिकडे आलेत आमचे अप्पा…
एकतर त्यांना धाडून दे, नाहीतर फोन जोडून दे…
तुला सांगतो अगदी स्पष्ट… अर्धीच राहिलीये आमची गोष्ट….
त्यांना म्हणावं ये‌ऊन जा… गोष्ट पुरी करुन जा
म्हणले होते ने‌ईन भूर्रर्र,एकटेच गेलेत केवढे दूर
डिटेल सगळा सांगतो पत्ता,तिकडे पाठव आमचे अप्पा
बाप्पा,बाप्पा बोला राव,सांगतो माझं नाव अन्‌ गाव….

कसलं नाव, नि कसला गाव…राँग नंबर लागला राव..!

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे




( Mi Pappancha dhapun phone - phone kele Ekshe don - Sandeep khare)

Sunday, March 20, 2011

एक झोका, चुके काळजाचा ठोका - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
एक झोका, चुके काळजाचा ठोका ll धृ. ll
उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका ll १ ll
नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका ll २ ll
जमिनीला ओढायचें
आकाशाला जोडायचें
खूप मजा, थोडा धोका ll 3 ll

गायक: आशा भोसले
संगीत: आनंद मोडक
गीत: सुधीर मोघे






( Ek Zoka chuke kalajacha thoka , ek zoka - Sudhir Moghe )

Friday, March 4, 2011

गुणी बाळ असा जागसि का रे वांया- गोविंदाग्रज

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया

अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||
हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||
निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||

चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ ||

ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||

गीत - राम गणेश गडकरी ’गोविंदाग्रज’
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर






( Guni baal asa jagasi kaa re waya - Govindagraj )

Tuesday, March 1, 2011

ससा की कापूस जसा - शांताराम नांदगावकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जावू
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबलेला कुणाशी बोलले ना
चालले लुटुतुटु पाही ससा

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांजवेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा

गायक :उषा मंगेशकर
संगीत :अरूण पौडवाल
गीत :शांताराम नांदगावकर






( Sasa to sasa ki kapus jasa - Shantaram Nandgaokar)

Saturday, February 12, 2011

सांग सांग भोलानाथ - मंगेश पाडगांवकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून, सुटटी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवडयातनं रविवार, येतील का रे तीनदा

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर

गीत - मंगेश पाडगांवकर





( Sang Sang Bholanath , paus padel kaay - Mangesh padgaokar )

Monday, February 7, 2011

टप टप टप टप टाकित टापा - शांता शेळके

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडील हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा !

गीत - शांता शेळके
संगीत - सी. रामचंद्र
स्वर - सुषमा श्रेष्ठ






( Tap tap tap tap takit taapa chale maza ghoda - Shanta Shelke )

Friday, February 4, 2011

खोडी माझी काढाल तर - शांता शेळके

( ऑडीओ सहित )
खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाइट,
घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट !

अंगावरती याल तर असा देइन ठोसा,
कोपऱ्यात जाउन तुम्ही रडत बसा, जावा रडत बसा !

बजरंग माझा भाऊ भीम माझा काका,
सांगुन ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका, वाटे जाऊ नका !

दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो,
अंगामध्ये ताकद आहे मग कोण भीतो, मग कोण भीतो ?

गीत - शांता शेळके
संगीत - मीना खडीकर
स्वर - योगेश खडीकर




( Khodi mazi kadhal tar - Shanta Shelke )