Showing posts with label इतर कवी. Show all posts
Showing posts with label इतर कवी. Show all posts

Monday, March 28, 2016

जीव पिसाटला - परतू


( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
वेड लावे जीवाला बघुनी तुला
पास असुनी तुझी आस लागे मला
एक क्षणही नकोसा दुरावा तुझा
श्वास माझा म्हणू की पुरावा तुझा
काय होणार माझे कळे ना मला
प्रेम छळते किती हे मला तुला
जीव पिसाटला पिसाटला रामा
बोलणे हे तुझे की फुलांचा सडा
हासता किणकिणे चांदण्यांचा चुडा
एवढासाच शृंगार पुरतो तुला
दृष्ट लागो न माझीच माझ्या फुला
जीव पिसाटला पिसाटला रामा
तूच तू सोबती तूच दाही दिशा
ध्यास हि तूच नि तूच माझी नशा
सावली तू कधी तू उन्हाच्या झळा
सांग डोळ्यात लपवू कसा मी तुला
रंग झालो तुझा रंगता रंगता
आग पाणी जणू एक झाले आता
जीव पिसाटला पिसाटला रामा


गायक - जसराज जोशी 
चित्रपट - परतू 
संगीत - शशांक पवार 
गीत - वैभव जोशी 

Singer: Jasraj Joshi
Movie: Partu
Music: Shashank Powar
Lyrics: Vaibhav Joshi






( Jeev pisatla - Partu - Jasraaj Joshi)

Tuesday, March 1, 2016

ओल्या सांजवेळी - प्रेमाची गोष्ट


( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी  ये जरा

कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी  जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील  या नव्या वाटेवरी तुझ्या

रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत  तुझी साथ दे

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : बेला शेंडे - स्वप्नील बांदोडकर
संगीत : अविनाश - विश्वजित 
चित्रपट : प्रेमाची गोष्ट 
Lyrics : Ashwini Shende
Singer : Bela Shende - Swapnil Bandodkar 
Music: Avinash - Vishwajeet  
Movie : Premachi Goshta


( Olya Sanjweli  -  Premachi Goshta)

Sunday, February 28, 2016

टिक टिक वाजते डोक्यात - दुनियादारी


( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात

नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने 
सोचू तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने 
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात 
टिक टिक वाजते ..


सूर ही तू, ताल ही तू 
रुठे जो चांद वो नूर है तू 
आसु ही तू हसू ही तू 
ओढ मनाची नि हूरहुर तू 
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात 
टिक टिक वाजते ..

गीतकार : मंगेश कांगणे 
संगीतकार : पंकज पडघन 
गायक : सोनू निगम - सायली पंकज
चित्रपट : दुनियादारी 
 Lyricist : Mangesh kangane 
Music Director : Pankaj Padghan 
Singer : Sonu Nigam ,Sayali Pankaj 
Movie : Duniyadari



( Tik Tik wajate Dokyat - Duniadari )

Thursday, February 16, 2012

कधी तू - श्रीरंग गोडबोले

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू
- कोसळत्या धारा
- थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
- सळसळत्या लाटा
-भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओलीरात

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी
रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात


चित्रपट : मुंबई पुणे मुंबई
दिग्दर्शक : सतीश राजवाडे
संगीतकार : अविनाश-विश्वजीत
गीतकार : श्रीरंग गोडबोले




( Kadhi Tu Rimzim zarnaari barasat - Shrirang godbole )

Wednesday, June 22, 2011

कविता : बिननावांच्या बिनचेहऱ्याच्या - अशोक पुंडे

1.

कुठूनशी एक आठवण येते
घेऊन येते विचारांची वाळलेली पानं
चालताना प्रत्येक पानं देतंय हुंकार
वाढतंच जाते विचारांची आणि आठवणींची गुंतावळ
घट्ट बंद केलेत मनाचे दरवाजे
तरीही थोड्याशा फटीतून येतच राहतात त्या
सलणारी जखम उघडी करण्यासाठी ...............

2.

आज पुंन्हा एकदा दिसलास तू
नजर चुकाउन पळायच्या प्रयन्तात होतास तू
खजील झालेला चेहरा तुझा
केविलवाणी नजर तुझी
तू होतास एक चुकलेला निर्णय
आयुष्याच्या एका वळणावर भेटलास तू,
स्वतःही चुकलास आणि मलाही चुकवलस ..............

3.

आयुष्याच्या संध्याकाळी माझ्या
दिसली माझी आई एका कोपऱ्यात
ती सुद्धा जुनी झाली आता
दाट सावलीसारख असणं तिचं
डोक्यात फिरणारे थरथरणारे हात तिचे
डोळे बंद करताच येतो तिचा चेहरा समोर
ओलावतात डोळे पुंन्हा पुंन्हा आठवणीने तिच्या .............

4.
पडझडीचे दिवस आजही आहेत
जसे काल नव्हते तसे नवेही येत आहेत
अशा दिवसानाही केले सुसह्य
त्यावरच केली आजवरची वाटचाल
पाय झिजले वर्तमानकाळाचा कायापालट करताना
संपले दिवस
संपला उपयोग
होऊ लागली अडचण
एका बेसावध क्षणी आलो इथे
स्वयंनिर्णयाला देखील स्वीकृती नव्हती
आता संवेदनशील जाणीवा देखील ठेवायच्या नाहीत
आता नाही आशेच फुल
आता नाही अपेक्षांचा पक्षी
एखादा संवाद फक्त मौनातच उमलणारा
खिन्न सूर्योदय
भरकटलेला दिवस
निराशेचा सूर्यास्त
मलूल चंद्रदोय
जीवघेणी रात्र
कोरड्या त्रयस्थ नजरा
बेदखल झालेलं अस्तित्व
पोहोचताच येत नाही कोणाजवळ
भाषा संपली
अस्तित्व झाल उपयोग नसलेल्या सहाव्या बोटासारख
हळू हळू वागवलं जातंय जगण्याच्या या चौकटीतून बाहेर काढल्या सारखं
नात्याचे गुंते संपताना तिळ तिळ तुटते आहे आतडं
पण आता दुसऱ्याच्या भावनेवर टाकलेलं आयुष्य उचलून दूर जाणार आहे
मृत्यूचा पापणी नसलेला डोळा बघण्यासाठी ...........................................

कवि : अशोक पुंडे
संग्रह : कविता - बिननावांच्या बिनचेहऱ्याच्या

( Kavita Bin navacha bin Cheharyanchya - Ashok Punde )

Tuesday, May 24, 2011

मी राधिका मी प्रेमिका - आरती अंकलीकर-टिकेकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
मी राधिका मी प्रेमिका
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घन:श्याम
रंगले जयाचे रंगी
मी राधिका मी प्रेमिका

अपरात्री कुंजवनी, सूर मधूर जाग मनी
कळेना, सुचेना, माझी मी उरेना, साहवेना
मीलनासी आतुरले
मी राधिका मी प्रेमिका

श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग
सुखाच्या क्षणी ही, मोहुनी वाजे ही मनवीणा
मंत्रमुग्ध मोहरले
मी राधिका मी प्रेमिका

येई भान तृप्त गात्र, गोकुळी पहाट मात्र
कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी उमजेना
श्यामक्षण जगले
मी राधिका मी प्रेमिका

गीत : नितीन आखवे
संगीत : श्रीधर फडके
स्वर : आरती अंकलीकर-टिकेकर


Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Mi Radhika , Mi Premika - Aarti anklikar -Tikekar )

Tuesday, May 10, 2011

गीत हे गाशील तेव्हा , मी जगी असणार नाही

( ऑडीओ सहित )
गीत हे गाशील तेव्हा, मी जगी असणार नाही
प्रीत ही स्मरशील तेव्हा, मी तुला दिसणार नाही

कालचे ना आज पाणी, अर्थ हे उरणार नाहीत
पाहूनी चंद्राकडे मी आसवे पुसणार नाही

चांदणे बिलगेल अंगा, कोवळे रेशीम होऊन
त्या क्षणी पाऊल माझे, हे पुन्हा फसणार नाही

गायक :अनुराधा पौडवाल

Get this widget | Track details | eSnips Social DNA

( Geet he gashil tevha mi jagi asanaar naahi )

Monday, May 9, 2011

दोन ध्रुवांवर दोघे आपण - मा. ग. पातकर

( ऑडीओ सहित )
दोन ध्रुवांवर दोघे आपण
तू तिकडे अन्‌ मी इकडे
वाऱ्यावरती जशी चुकावी
रानपाखरे दोहिकडे

दिवस मनाला वैरि भासतो
तारा मोजित रात गुजरितो
युगसम वाटे घडीघडी ही
कालगती का बंद पडे ?

वसंतासवे धरा नाचते
तांडव भीषण मज ते गमते
गजबजलेल्या जगात जगतो
जीवन एकलकोंडे

नि:श्वसिते तव सांगायाला
पश्चिमवारा बिलगे मजला
शीतल कोमल तुझ्या करांचा
सर्वांगी जणु स्पर्श घडे

स्मृति-पंखांनी भिरभिर फिरते
प्रीतपाखरू तुझ्याच भवते
मुक्या मनाचे दु:ख सागरा
सांग गर्जुनी तू तिकडे

तोच असे मी, घर हे तेही
तोच सखी, संसार असेही
तुझ्यावाचुनी शून्य पसारा
प्राण तिथे अन्‌ देह इथे

गीत : मा. ग. पातकर
संगीत : गजानन वाटवे
स्वर : गजानन वाटवे


Get this widget | Track details | eSnips Social DNA

( Don Dhruvawar doghe aapan - ma ga Patkar)

Saturday, April 2, 2011

धुंद होते शब्द सारे - कौस्तुभ सावरकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे
कैसे गुंफू गीत हे धुंद होते शब्द..

मेघा दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा - 2
चांद राती भाव गुंतुनी बहरला निशीगंध हा
का कळेना काय झाले .. भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे......

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे...
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

गीत: कौस्तुभ सावरकर
गायक : रविन्द्र साठे, रविन्द्र बिजूर, बेला।
संगीत : अमरत्य राउत






( Dhund hote shabd saare dhund hotya bhavana - Kaustubh Sawarkar )

Wednesday, March 9, 2011

महाराजांची किर्ती बेफांम - पोवाडा

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
शिवाजी महाराजांची किर्ती, बेफांम होती
महाराजांची किर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम
बडी बेगम म्हणजे आपली आदिलशहाची आई बर का..

नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,
कुणी घेईना पुढाकार, सार्‍यानीच मानली हार,
इतक्यात अचानक एक सरदार उठला
बोलला मैं लाऔंगा शिवाजी को

अन् त्याने विडा उचलला, नाव त्याच अफझलखान....
नाव त्याच अफझलखान
जीता जगता जणू सैतान
खान बोलला छाती ठोकून,
शीवाबाला टाकतो चिरडून
मरहब्बा, सुभनलला
कौतिक झाल दरबारात
खान निघाला मोठ्या गूर्मित
त्याचे घोडदल पायदल
फौजा फाटा लई बक्कळ
अंगी दहा हत्तीच बळ,
पाहणारा कापे चलचाल
वाटेत भेटेल त्याला चिरडित,
ठेचीत, खानाची सेना निघाली
गाव लुटली, देवल उद्ध्वस्त केली
आया बहिनींची आब्रू लुटली
कोण, कोण रोखणार हे वादळ

आता शीवाबाच काही खर नाही
इकड निजाम , तिकडे मोघल
पालिकड इंग्रज, जो तो हेच बोलू लागला
राजाची सेना मूठभर, खानाला कसा थोपनार
काय लढवावा हुन्नार, चिंतेत पंत सरदार
पण आई जिजाऊ , पण आई जिजाऊ म्हणाली
शिवबा हा अवघ्या मराठी जनाचा अभिमान आहे,
या मातेने आपला पुत्रा गमावला तरी बेहत्तर पण या मराठी मातीचा अभिमान गामावू नये.
अश्या वघीनिचा तो छावा.... 2

गणिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा
भेटिचा धडला सांगावा प्रतापगडावर,
प्रतापगडावर आमने सामने
भेटिचा सांगावा खाणान
हसत हसत काबुल केला दिवस ठरला.....
दिवस ठरला, अन्न ठरल्या प्रमाणे
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान
हा प्रतापगडाच्या पायथ्याशी खान
आला बेगुमान त्याला नाही जान
शिवाजी राजाच्या कारामातीची 3
आन त्यासी नाही जाणीव शक्तीची
त्यासी नाही जाणीव शक्तीची
त्यासी नाही जाणीव शक्तीची
आन करील काय कल्पना युक्तिचि
हा जी जी जी

खानाच्या भेटी साठी महाराजनी
एक शानदार शामीयाना उभारला होता
भेटीसाठी छन उभॅरीला 3
नक्षीदार शामियण्याला 2
आन अश्या या शामियण्यात
खान डौलत दुलत आला 2
सय्यद बॅंडा त्याचा संगतीला 2
शीवाबाच्या संगती महाला 2
राजाला पाहून, राजाला पाहून
खान म्हणतो कसा, हा हा हा
आओ, आओ शिवाजी आओ
हूमारे गले लग जाओ, आओ हा.... हा..... हा.......
खान हाक मारितो हसरी 2
रोखून नजर गहिरी
जी र जीरजी जी जी 2
खाणान राजाला आलिंगन दिला
अन् दगा केला,
खान दाबी मान मानयाला 2
काट्यारीचा वार त्यान केला 2
खार खार आवाज झाला 2
चिलखत व्हत्ाय अंगाला 2
खानाचा वार फुका गेला, खान एडबडला,
इतक्यात महारजान, पोटामॅढी बिच्चुवा धकलला
पोटामॅढी बिच्चुवा धकळला
वाघ नखचा मारा केला 2
टॅरा टॅरा फडळ पॉटला
तडा गेला खानाचा कोठला
बाहिर आला जी, जी, जी 3





( Maharajanchi Kirti Befaam - Powada )

Sunday, February 27, 2011

मन - राघवेंद्र तारे

मुक्त माझे मन
त्याला उडायचंय वाऱ्यावर

वाऱ्याचे झोके अंगावर घेत
दिसेल जे वाटेत आपल्या मुठीत घेत
अनुभव घ्यायचं त्या प्रत्येक गोष्टीचा
प्रत्येक विचित्र दिवसाचा तसेच रात्रीचा

झेप का एकदा घेतली मनाने
मनाच्या मनात कधी येउच नये थांबणे
ना झाडांचा अडकाव ना नद्यांची एकच दिशा
ऐकून आतली हाक, फक्त आणि फक्त उडतच जाणे

मनात येईल ते करत जावं
वाटेल तिकडे सुसाट पळावं
आणि या अंतर्ध्वनीच्या आवाजात
नाचत बागडत उडत खेळावं

कधी अंगावर विचारांची थेंब पडावी
आणि हीच थेंब घेऊन एक नक्षीदार तळच बांधावं
न्यावं हे तळ अशा एका ठिकाणी
पक्ष्यांच्या किलबिलाटात होतील ,
या तळरुपी कवितांची सुंदर सुरेल गाणी !!!

आठवडा - राघवेंद्र तारे

आठवड्यातल्या दिवसांशी जरा खेळावस वाटतं
प्रत्येक दिवशी काहीतरी करावस वाटतं
सोमवारी म्हंटल जावं जरा तलावाकाठी
सहज तिथे तिची आठवण काढण्यासाठी
मंगळवारी घ्यावं म्हंटल वाचन तरी हाती
विचारांसोबत जीवन उंच नेण्यासाठी
बुधवारी म्हणावं साला अभ्यासच करतो
गुरुवार पर्यंत तर करूनच दाखवतो
शुक्रवार खरतर माझा आवडता नाही
पण आला कि तो मी विसारातही नाही
कारण शुक्रवारीच ती मला भेटली होती
हसली होती ती पाहून , जरी खोटी खोटी

शनिवार काढावा म्हंटल भेटायला मित्रांना
सहज उनाडक्या करत रस्त्यावर फिरतांना
सांगावी त्यांना सप्ताहाची कहाणी
न सहज निघाव्या जुन्या आठवणी
जगण्यासाठी काहीतरी शिकवून तो जातो
संपताना रविवार विचार एक येतो
कि
"नसावा आठवडा तसाच आणि दिवसही पुढचे तेच
नसावा आठवडा तसाच आणि दिवसही पुढचे तेच ,
नको जीवनातले ..... सगळे आठवडे सारखेच ...सगळे आठवडे सारखेच"




( - )

Tuesday, February 22, 2011

मी व्यथांना अंतरीचे गाव देतो - प्रसन्न शेंबेकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो

सागराने ऐनवेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो

मागतो जो तो फुले ताजीतवानी
कोण निर्माल्यास येथे भाव देतो?

खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे
ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो

हासलो आजन्म खोट्या चेहऱ्यांनी
आज दुःखाला जरासा वाव देतो

गीत - प्रसन्न शेंबेकर
संगीत - विवेक काजरेकर
स्वर - सुरेश वाडकर




( Mi Vyathanna Antariche gaav deto - Prasanna Shembekar Sung By Suresh Wadkar )

Thursday, February 17, 2011

विठ्ठला- कोणता झेंडा घेऊ हाती - अरविंद जगताप

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जगन्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो,
आपली माणसं ... आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भिती
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता,
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचा-या जळति वाती,
वैरी कोण आहे इथे कोण साथी, विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

बुजगावण्या गत व्यर्थ हो जगनं, उभ्या उभ्या संपून जाई,
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई,
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे येगळ्या जाती,
सत्येचीच भक्ती सत्येचीच प्रिती, विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?


गीत - अरविंद जगताप
संगीत - अवधूत गुप्ते
स्वर - ज्ञानेश्वर मेश्राम






( Vitthala konata mi zenda gheu hati - Arvind Jagtap)

Monday, January 31, 2011

जीव दंगला गुंगला रंगला - संजय पाटील

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू

खुलं आभाळ ढगाळ
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू

खुण काळीज हे माझं
तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन
माझ्या जन्माचा गोंधळ

गीत : संजय पाटील
संगीत : अजय - अतुल
गायक: हरिहरन , श्रेया घोशाल





( Jeev dangala , gungala , rangala asa - Jogwa )

Thursday, December 16, 2010

अनादी - सुधीर भिडे

( रवींद्र नाथ ठाकूर यांच्या कवितेचा स्वैर भावानुवाद )
अथांग निळ्या आकाशातून
उठताहेत शांती च्या लाटा .

अन करून पानांचे पेले
झाडांनी , अडविल्या सूर्य किरणांच्या वाटा.

दमट हिरवळीवर जाणवताहेत
या चेतन सृष्टी चे उश्वास .

अरे ! युगानुयुगे मीच तर
जगतोय , अनुभवतोय .........
होय ! अनादी काला पासून
चालूच आहे हा माझा प्रवास

( Anadi - Translation of a poem by Ravindranath Tagore - translation by Sudhir Bhide )

Monday, June 21, 2010

हंगामा है क्यूं बरपा - अकबर एलाहबादी

हंगामा है क्यूं बरपा.. थोडी सी जो पी ली है..
डाका तो नहीं डाला.. चोरी तो नहीं की है..

उस मे से नही मतलब.. दिल जिस से है बेगाना..
मकसुद है उस मे से.. दिल ही मे जो खिंचती है..

सूरज में लगे धब्बा.. कुदरत के करिश्में हैं..
बुत हमको कहें काफ़िर.. अल्लाह की मर्ज़ी है..

ना तजुर्बाकारी से वाईज़ की ये बातें हैं..
इस रंग को क्या जाने.. पूछो तो कभी पी है..

वा दिल में की सदमे दो.. या की मे के सब सह लो..
उनका भी अजब दिल है.. मेरा भी अजब जी है..

हर ज़र्रा चमकता है.. अनवार-ए-इलाही से..
हर सांस ये कहती है.. हम हैं तो खुदाई है..

हंगामा है क्यूं बरपा.. थोडी सी जो पी ली है..
डाका तो नहीं डाला.. चोरी तो नहीं की है..

गायक - गुलाम अली


अभिजित पानसे यांच्या फ़रमाइशिवरून
( Hungama hai kyun barapa . thodi si jo pi li hai )

Tuesday, June 1, 2010

Right here waiting - Richard Marx

(With Audio-Video)
Oceans apart day after day
And I slowly go insane
I hear your voice on the line
But it doesn't stop the pain

If I see you next to never
How can we say forever

Wherever you go -Whatever you do
I will be right here waiting for you
Whatever it takes Or how my heart breaks
I will be right here waiting for you

I took for granted, all the times
That I thought would last somehow
I hear the laughter, I taste the tears
But I can't get near you now

Wherever you go - Whatever you do
I will be right here waiting for you
Whatever it takes Or how my heart breaks
I will be right here waiting for you

I wonder how we can survive -
This romance
But in the end if I'm with you -
I'll take the chance

Wherever you go - Whatever you do
I will be right here waiting for you
Whatever it takes Or how my heart breaks
I will be right here waiting for you

Sunday, May 16, 2010

चुपके चुपके रात दिन - हसरत मोहनी

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
अपनी आवाज़ की लर्ज़िश पे तो क़ाबू पा लो
प्यार के बोल तो होंठों से निकल जाते हैं
अपने तेवर तो सम्भालो के कोई ये न कहे
दिल बदलते हैं तो चेहरे भी बदल जाते हैं

अब मैं समझा तेरे रुख़सार पे तिल का मतलब
दौलत-ए-हुस्न पे दरबान बिठा रखा है
गर सियाह-बख़्त ही होना था नसीबों में मेरे
ज़ुल्फ़ होता तेरे रुख़सार पे या तिल होता

चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है
हमको अब तक आशिक़ी का वो ज़माना याद है

तुझसे मिलते ही वो कुछ बेबाक हो जाना मेरा
और तेरा दाँतों में वो उँगली दबाना याद है

चोरी चोरी हमसे तुम आ कर मिले थे जिस जगह
मुद्दतें गुज़रीं पर अब तक वो ठिकाना याद है

दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिये
वो तेरा कोठे पे नंगे पाँव आना याद है

खैंच लेना वो मेरा पर्दे का कोना दफ़तन
और दुपट्टे से तेरा वो मुँह छुपाना याद है

तुझको जब तन्हा कभी पाना तो अज़-राह-ए-लिहाज़
हाल-ए-दिल बातों ही बातों में जताना याद है

आ गया गर वस्ल की शब भी कहीं ज़िक्र-ए-फ़िराक़
वो तेरा रो रो के भी मुझको रुलाना याद है

वाँ हज़ाराँ इज़्तिराब, याँ सद-हज़ाराँ इश्तियाक
तुझको वो पहले-पहल दिल का लगाना याद है

जान कर होना तुझे वो कसद-ए-पा-बोसी मेरा
और तेरा ठुकरा के सर वो मुस्कुराना याद है

जब सिवा मेरे तुम्हारा कोई दीवाना न था
सच कहो कुछ तुमको अब भी वो ज़माना याद है

ग़ैर की नज़रों से बच कर सबकी मर्ज़ी के ख़िलाफ़
वो तेरा चोरी छिपे रातों को आना याद है

देखना मुझको जो बरगश्ता सौ नाज़ से
जब मना लेना तो फिर खुद रूठ जाना याद है

शौक़ में मेहंदी के वो बे-दस्त-ओ-पा होना तेरा
और मेरा वो छेड़ना वो गुदगुदाना याद है

गायक - गुलाम अली



( Chupke chupke raat din ansu bahana yaad hai )

Friday, May 14, 2010

अनंता तुला कोण पाहु शके - बा.भ. बोरकर

( ऑडीओ सहित )
अनंता तुला कोण पाहु शके
तुला गातसा वेद झाले मुके
मतीमंद अंधा कसा तू दिसे
तुझी रूप तृष्णा मनाला असे

तुझा ठाव कोठे कळेना जरी
गमे मानसा चातुरी माधुरी
तरू वल्लरींना भुकी मी पुसे
तुम्हा निर्मिता देव कोठे वसे

फुले सृष्टीची मानसा रंजिती
घरी सोयरी गुंगविती मती
सुखे भिन्नही येथे प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके

तुझे विश्व ब्रम्हांडही निःस्तुला
कृति गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषु शके

नवी भावपुष्पे तुला वाहिली
तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू कल्पना जल्पना त्या हरो

गायक - पं. जितेंद्र अभिषेकी


वरील कविता श्री. सुधीर भिडे यांच्या सहयोगानी
( Ananta tula kon pahu shake )