Sunday, April 4, 2010

यात काही पाप नाही - मंगेश पाडगांवकर

सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !

जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,
लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !

देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,
गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !

प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !

(Yat kahi paap nahi - mangesh padgaokar )

2 comments:

  1. भानस , शिरीष आणि मनमौजी - तुमचे खुप खुप धन्यवाद ! भानस खरं आहे, मेहेंदी हसन ची गाणी मला सुद्धा फार आवडतात.

    ReplyDelete
  2. kavitechya oli aekun manapasun dad deta yete...

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.