Friday, April 2, 2010

अद्यापही सु-याला - सुरेश भट


अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही

येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही

हे दु:ख राजवर्खी .. ते दु:ख मोरपंखी..
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
( गावात सज्जनांच्या आता तणाव नाही )

झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही

गर्दित गारद्यान्च्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाव नाही

जावे कुण्या ठिकाणी उद्वस्त पापियांनी?
( संतांतही घराच्या राखेस भाव नाही )

उचारणार नाही कोणीच शापवाणी…
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे…
हा थोर गाडुंळाचा भोंदू जमाव नाही !

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही
( Adyap hi suryala maza sarav naahi, adyap hi puresa ha khol ghav naahi _

4 comments:

  1. "अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही"

    घाव अन खोल या शब्दांची जागा बदलली आहे

    अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही- असे पाहिजे होते...

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.