Monday, April 5, 2010

म्यानातून उसळे तलवारीची पात - कुसुमाग्रज

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गदीर्त लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्‍यावर गात

( Myanatun Usale talawarichi Paat , Vedat marathe veer daudale saat )

4 comments:

  1. Raaje...
    Tumchi Khup Aathvan Yete

    ReplyDelete
  2. Raaje...
    Tumchi Khup Aathvan Yete

    ReplyDelete
  3. अंगावर शहारे आणणारे गाणे आहे....

    ReplyDelete
  4. केवळ अप्रतिम..! कुसुमाग्रजांचे अजोड काव्य, दिदिंचा सुरेल स्वर, पंडितजींच्या सुयोग्य चालीने अंगावर रोमांच उभे राहिले...एक नी: शब्द करणारा अनुभव...!!

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.