Wednesday, June 22, 2011

पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा - जगदीश खेबुडकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
दरबार जुना हो हंड्या झुंबर नवं
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर दिवं
अंगाअंगी मी रंग खेळते, केसामधी मरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा !

नख लागंल बेतानं खुडा
केशरी चुना अन्‌ कात केवडा
लई दिसानं रंगल्‌ विडा
व्हटाची लाली टिपुनी घ्याया
मुखडा असा फिरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा !

थोडी झुकून थोडी वाकते
पडला पदर, लाज झाकते
नेम धरून बाण फेकते
तुमची माझी हौस इश्काची
हळू हळू पुरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा !

गीत : जगदीश खेबुडकर
संगीत : राम कदम
स्वर : शोभा गुर्टू
चित्रपट : कलावंतीण


Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Pikalya panacha deth ki ho hirawa - Jagadish Khebudkar )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.