कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना
रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
बारीक सुपारी निमचिकनी घालून
जायपत्री वेलची लवंग वरी दाबून
बांधले तसे या कुडीत पंचप्राण
घ्या रंगत करि मर्दुनी, चतुर्दशगुणी, सख्या सजणा
कमरेचा झुलता झोक नूर बिनधोक उरी मावेना
काजळी नजर छिनमिनी चांदणी रैना
छेडिता लालडी मुलाम तुमची गुलाम झाले सजणा
पायी पैंजण छ्न्नक छैना
गीत - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - सुलोचना चव्हाण
|
( Kalidar kapuri paan , kowala chaan keshari chuna - Raja Badhe )
शंतनू,
ReplyDeleteह्या गाण्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ, ऐकला नि पहिला नि कानसेन म्हणून खरे सांगावेसे वाटते कि त्या काळी कै.खळे साहेबांना ह्या गाण्याच्या आवाजासाठी हे दोन्ही पर्याय जर उपलब्ध असते तर त्यांनी उर्मिलाच्या जास्त स्पष्ट व ह्या धर्तीच्या गाण्यास एकदम फिट्ट नि धारदार आवाजाला जास्त पसंती दिली असती हे नक्की.सदरहू कार्यक्रमात नंतर जेव्हा सुलोचनाबाई आल्या होत्या तेव्हा त्यांनी विनाकारणच उर्मिलाच्या ह्या गाण्यात खोट काढून कानसेनांची मने दुखावली होती."जिंदगीमे अगर बडा बनाना है, तो छोटी हरकते छोड देनी चाहिये " अस जे म्हणतात ते उगीच नाही.
Ekdum khara aahe . in fact he gana aaiklyawar adhi mala watla ki Devki chya aawajachi dhaar ya ganyala aali tar kaay majja yeil.
ReplyDeleteWell said !