समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !
सर एक श्रावणाची आली … निघुन गेली…
माझ्या मुक्या ञुषेला पण बोलता न आले?
सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले!
चुकवुनही कसा हा चुकला न शब्द न माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले !
लपवीत गीत माझे पळ काढला तरीही
ह्रुदयांतल्या विजांना झिडकारता न आले!
केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखरे माझे मज टाळता न आला!
गीत : सुरेश भट
संगीत : रवि दाते
स्वर : सुरेश वाडकर
|
श्री संतोष गोळवलकर यांच्या विंनंतीवरून . आभार संतोष, ईतकं सुंदर गाणं सुचवल्याबद्दल.
( Samajauni vyathela samajawata na aale - Suresh Bhat )
खूपच छान गाण आहे हे ..... प्रत्येक ओळीत खोल आणि गंभीर अर्थ लपलेला आहे
ReplyDelete100% खर आहे मित्रा . आणि या अशा गजला फक्त भट साहेबच लिहू शकतात .
ReplyDeleteI like It.
ReplyDelete