Monday, April 11, 2011

धरिला वृथा छंद - मंगेश पाडगावकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
धरिला वृथा छंद
नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद?

जरि जीव हो श्रांत
नाही तृषा शांत
जलशून्य आभास शोधित मृग अंध

झाले तुझे भास
मी रोधिले श्वास
माझीच मज आस घाली असा बंध

पथ सर्व वैराण
पायी नुरे त्राण
माझेच घर आज झाले मला बंद

गायक:सुरेश वाडकर
संगीत:श्रीनिवास खळे
गीत:मंगेश पाडगावकर






( Dharila Vrutha Chhand - Mangesh Padgaokar )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.