Monday, May 10, 2010

देणा-याने देत जावे - विंदा करंदीकर

देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे

हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावे.
( Denaryane det jaave , ghenaryane ghet jaave )

10 comments:

  1. *दान करवे थोडे का होइना* - देणा~याने देत जावे,ह्यावर खरे तर लिहिणार
    होतो-घेता घेता देणार्याचे हात घ्यावे ह्या तत्वावर आज फ़्री राइस ह्य साइटवर
    जावून १५० ग्राम दान केले म्हणजे १६ पैकी १५शब्दार्थ बरोबर आले त्र शब्दामागे
    १०ग्राम दान केले जाते ह्या हिशोबाने मी गरिबांना १५० ग्राम तांदुळ
    दिला.इतरांनीही हा पयत्न करावा ,म्हणजे ह्या संदेशाचा उपयोग झाला असे म्हणता
    येइल.

    ReplyDelete
  2. supabbbb...........

    ReplyDelete
  3. हि कविता कृतीत उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी करावा 🙌

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.