या आधी कुठल्याच कवितेबद्दल मी कधी काही लिहिलं नाही. उद्देश हाच कि त्या कवितेचं / गाण्याचं रसग्रहण कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय व्हावं. पण या कविते साठी मात्र अपवाद म्हणून थोडं लिहिणार आहे.
माझी संदीप नि लिहिलेली अत्यंत आवडती कविता. आणि त्याला सलील नि संगीत सुद्धा तितकाच समर्थ पणे दिलंय. गाणं जरा कुठे शास्त्रीय अंगानी जायला लागलं असं वाटायला लागतं तितक्यात एक छोटा पाश्चिमात्य तुकडा वाजतो अगदी बेमालूम बसणारा. आणि मृदुंगाचा केलेला वापर अप्रतिम.
नक्की ऐका. कारण संदीप ची कविता सुद्धा यात अप्रतिम आहे.
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे
बाकी सारे आकार ऊकार, होकार नकार...
बाकी सारे आकार ऊकार, होकार नकार मागे पळत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागेमागे जातजात पुसट होत चालले आहेत
पुसत जावेत ढगांचे आकार आणि उरावे एकसंध आभाळ...
- तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं
भरून आलेली गाफील गाणी, काळे सावळे ढ़ग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे
"बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले अन् क्षितीजावर रंग नवे अवतरले
घन दताताच एक क्षणात हे रंग बंध विस्कटले
तुटले!!! "
विसरत चाललोय
विसरत चाललोय नावेतुन उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवाराचे बहाणे
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली...
ती लाट तर तेव्हाच पुसली मनातल्या इच्छेसराखी
सरोवर मात्र अजुनही तिथेच....
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे पाणीसुध्हा नवंय कदाचित....
पण तरीही जुन्याच नावाने सरोवाराला ओळखताहेत सगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे!!!
"क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे वा मृगजळ हे भासांचे?
सुटलेच हात, आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले
तुटले!!!!"
तुझ्याकडे, माझी सही नसलेली माझी एक कविता, मीही हट्टी ....
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली एक काचेची पट्टी!
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजुनही....
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजुनही,
थोडेसे शब्द, बरंचसं मौन अजुनही!
बाकी अनोळखी होवून गेलो आहोत...
बाकी अनोळखी होवून गेलो आहोत, तुझा स्पर्श झालेला मी,
माझा स्पर्श झालेली तू, आणि आपले स्पर्श झालेलेहे हे सगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे!!!
"मज वाटायचे तेव्हा हे क्षितीजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती
फसवेच ध्यास, फसवे प्रयास, आकाश कुणा सापडले?
तुटले!!!"
उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नही
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत
वाळुवरची अक्षरे पुसट होत जातात
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात
शेपटीच्या टोकांवरचे हट्ट सरळ होत
जातात विसरण्याचा छंदच जडले आताशा मला
या कविताना, शहरभर पसरलेल्या संकेत स्थळांना
विसरत चाललेल्या आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ
अन् विसरत चालले आहे आभाळालाही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे
"मी स्मरणांच्या वाटांनी वेडयागत अजुन फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो
सरताच स्वप्न, अंतास सत्यहे आसवांत ओघळले
तुटले!"
... आता आठवतायत ... ते फक्त काळेभोर डोळे!!!!
chan blog aahe...
ReplyDeletemajhya blogvar sandeep kharechya itar kavita milateel...
http://sandeepkharekavitangaani.blogspot.com/
he gan milale ka??
ReplyDeleteMhanje kaay ?
ReplyDeletekhup khup chan. punha punha aaikat rahave ase vatate.
ReplyDelete@megha - very true, this song has all qualities of being an immortal song
ReplyDelete