( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे
दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे
अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे, पोकळ समाधी
देई कोण हाळी त्याचा, पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे, ज्याच्या गळी साजे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..
It is my daily rejoicing routine to read your blog from Marathi blog site.Sometimes, you provide a sad but thought provoking song like today's. But I wait for the next day again for your selective post. Can I have your e-mail id? So I can contact you separately also. Regards.
ReplyDeleteMangesh Nabar
धन्यवाद मंगेश ! मी काहीही वेगळं असं करत नाहीये . आपल्या आवडीच्या गाण्याचा संग्रह करण्याचा तेवढा मानस आहे. त्यात तुझ्यासारखे चाहते - मित्र मिळाले हे माझा भाग्य.
ReplyDeleteEMail Id - प्रकाशित केलं आहे
आरती प्रभूंची मी एकदम वेडी. व्हिडीओही टाकलास त्यामुळे लगेच ऐकायला मिळाले. धन्स. अप्रतिम रचना मात्र मन उदास होऊन जाते. असेही आरती प्रभूंचे बहुंताशी काव्य दु:खाची गडद छटा घेऊनच येते अन तेच खानोलकरांचे गद्य लिखाण मात्र अगदीच वेगळी अनुभूती देऊन जाते.
ReplyDelete