Showing posts with label गुरु ठाकुर. Show all posts
Showing posts with label गुरु ठाकुर. Show all posts

Saturday, February 27, 2016

मला वेड लागले प्रेमाचे - गुरु ठाकूर


( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा 
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा 
हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे 
का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे 
मला वेड लागले प्रेमाचे 

नादावला, धुंदावला, कधी गुंतला जीव बावरा
नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा 
मला वेड लागले प्रेमाचे 

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटले माझे मला 
खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा 
मला वेड लागले प्रेमाचे 

गीतकार : गुरु ठाकूर
संगीतकार : चिनार - महेश
गायक : स्वप्नील बांदोडकर
चित्रपट : टाईमपास
Lyricist : Guru Thakur
Music Director : Chinar - Mahesh,
Singer : Swapnil Bandokar
Album/Movie : Timepass



( Mala ved lagle Premache - Guru Thakur )

Saturday, May 21, 2011

आता वाजले कि बारा - गुरु ठाकुर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं कसा जीवं झाला यडापीसा
त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटु कवातरी साजणा ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

ऐन्यावानी रुप माझं ऊभी ज्वानीच्या मी ऊंबऱ्यात
नादावलं खुळंपीसं कबुतर ह्ये माज्या ऊरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
ऊगा घाई कशापायी हाये नजर ऊभ्या गावाची

(नारी गं, रानी गं, हाये नजर ऊभ्या गाचाची)

शेत आलं राखनीला राघु झालं गोळा
शिळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा
आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू
राया भान माझं मला ऱ्हाईना ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

आला पाड झाला भार भरली ऊभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात
गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना
आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना

(नारी गं, रानी गं, कसं गुपीत राखू कळंना)

मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताचि ही तुम्ही ऱ्हाऊ द्या ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

गीत : गुरु ठाकुर
संगीत :अजय अतुल
चित्रपट् : नटरंग


Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Mala jau dya na ghari ata vajale ki baara - Guru Thakur )

Wednesday, May 18, 2011

परी म्हणू की सुंदरा - गुरु ठाकूर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
परी म्हणू की सुंदरा तिची तऱ्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली

तिचे वळून पाहणे
मधाळ गोड बोलणे
कधी खट्याळ हासणे
हळूच जीभ चावणे
मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली

हजारदा ती भेटते
बोलुबोलु वाटते
बोलणे मनातले
परि मनीच राहते
मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली

गीत : गुरु ठाकूर
संगीत : अवधूत गुप्ते
स्वर : अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर


Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Pari mhanu ki sundara tichi tarha ase jara nirali - Guru Thakur )

Wednesday, February 9, 2011

खेळ मांडला - गुरु ठाकुर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
तुज्या पायरिशी कुणी सानथोर नाही,
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई,
हे तरी देवा सर ना ह्यो भोग कशापाई,
हरवली वाट दिशा अंधारल्या धाई,
ओवालुनी उधलतो जिव मायबापा,
वणवा ह्यो उरी पेटला......
खेळ मांडला, खेळ मांडला,
खेळ मांडला, देवा....खेळ मांडला..."

सांडली गाडीत वाहत घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीवगा खेल मांडिला......
दावी देवा पैल पार पाटिशी तू रहा उभा
ह्यो तुझाच उबर्यत खेल मांडिला.....
हे...

उसवल गण गोत सार
आधार कुणाचा नाही
भेगाडल्या भुई परी जिन
अंगार जिवाला जाळी
बळ दे जुंजायाला कीर्तीची ढाल रे
इन्विती पंच प्राण जिव्हारत थान रे
करपल रं देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला
खेळ मांडला...

गीत-गुरु ठाकुर
संगीत -अजय अतुल






( Khel Mandala - Guru Thakur)