( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
भय ईथले संपत नाही,मज तुझी आठवण येते,
मी संध्याकाळी गातो ,तु मला शिकविली गीते
हे झरे चंद्र सजणाचे ,ही धरती भगवी माया,
झाडाशी निजलो आपण,झाडात पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा ,आयुष्य स्पर्शुनी गेला,
सितेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला
स्त्तोत्रांत ईंद्रिये अवघी गुण्गुणती दु:ख कुणाचे,
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणांचे
भय ईथले संपत नाही,मज तुझी आठवण येते,
मी संध्याकाळी गातो ,तु मला शिकविली गीते
(मूळ गाणं : गायक - लता मंगेशकर)
( Bhay ithale sampat naahi )
No comments:
Post a Comment
Please comment. Your review is very important for me.