Wednesday, March 10, 2010

तुला पाहिले मी - ग्रेस

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठिवरी मोकळे
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्ष-माळेतले सावळे ||

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली ||

मना वेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
जसे संचिताचे ऋतु कोवळे ||

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा ||

गीत : ग्रेस
गायक : सुरेश वाडकर
संगीत : हृदयनाथ मंगेशकर





( Tula Pahile Mi nadichya kinari - Grace )

4 comments:

  1. It's simply wonderful to read and listen to the tunes you have presented with choice. I would thank you and request you to present some selected songs sung by late Shri.Dasharth Pujari ( e.g Ajun tyaa jhudupaanchyaa maage...)and Smt.Suman Kalyanpur.
    Regards.

    ReplyDelete
  2. आवडली कविता आणि ब्लॉग पण.

    ReplyDelete
  3. कधीही ऐकले तरी आवडते.
    बऱ्याच काळानंतर घडलेले एक खूप चांगले गाणे.
    पण यालाही तीन वर्षे झाली.

    ReplyDelete
  4. सुंदर गाणे, मात्र याला संगीत श्रीधर फडके यांचे आहे, बाळासाहेबांचे नाही.

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.