Showing posts with label भा. रा. तांबे. Show all posts
Showing posts with label भा. रा. तांबे. Show all posts

Friday, February 18, 2011

घन तमीं शुक्र बघ राज्य करी - भा. रा. तांबे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !

ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी

प्रसवे अवस सुवर्णा अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?

फूल हसे काट्यांत बघ कसे
काळ्या ढगि बघ तेज रसरसे
तीव्र हिमांतुनि वसंतहि हसे
रे, उघड नयन, कळ पळे दुरी

फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?

मना, वृथा का भीती मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी

गीत :भा. रा. तांबे
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर






( Ghan Tami Shukra bagh rajya kari - Bha Ra Tambe )

सूजित काणे यांनी सुचवलेलं गाणं ! सूजित आभार !

Monday, May 24, 2010

मावळत्या दिनकरा - भा. रा. तांबे

मावळत्या दिनकरा
अर्ध्य तुज जोडोनि दोन्ही करा

जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवी मावळत्या
रित जगाची ही रे सवित्या
स्वार्थपरायणपरा

उपकाराची कुणा आठवण
"शिते तोवरी भूते" अशी म्हण
जगात भरले तोंडपूजेपण
धरी पाठीवर शरा

असक्त परि तू केलीस वणवण
दिलेस जीवन हे नारायण
मनी ना धरिले सानथोरपण
समदशीर् तू खरा


( Mavalatya Dinakara )