Showing posts with label पी. सावळाराम. Show all posts
Showing posts with label पी. सावळाराम. Show all posts

Wednesday, August 3, 2011

प्रेमा, काय देऊ तुला ? - पी. सावळाराम

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
प्रेमा, काय देऊ तुला ?
भाग्य दिले तू मला

प्रीतीच्या या पाखराचे रत्‍नकांचनी पंख देऊ का
देऊ तुला का हर्षगंध हा जीव फुलातून मोहरलेला

या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढ ती तुला हवी का
रूप मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला

मोहक सुंदर जे जे दिसते, तूच तयांचा जन्मदाता
घेशील का रे माझ्याकरिता अधरीच्या या अमृताला

गीत : पी. सावळाराम
संगीत : वसंत प्रभू
स्वर : लता मंगेशकर




( Prema Kaay deu tula, bhagya dile tu mala - P Sawalaraam )

Sunday, July 31, 2011

देव जरी मज कधी भेटला - पी. सावळाराम

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
देव जरी मज कधी भेटला,
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे,
जीवन देई मम बाळाला

कृष्णा गोदा स्नान घालु दे,
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी,
मुक्ताई निजवु दे तुजला

शिवरायाच्या मागिन शौर्या,
कर्णाच्या घेइन औदार्या
ध्रुव, चिलयाच्या अभंग प्रेमा,
लाभु दे चिमण्या राजाला

गीत : पी. सावळाराम
संगीत : वसंत देसाई
स्वर : आशा भोसले




( Dev jari maj kadhi bhetala - P Sawalaraam )

Friday, March 25, 2011

जिथे सागरा धरणी मिळते - पी. सावळाराम

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पहाते ||

डोंगर दरीचे सोडून घर ते
पल्लव पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनि जेथे
प्रीत नदीशी एकरूप ते ||

वेचित वाळूत शंख शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येऊनी
धुंदित यौवन जिथे डोलते ||

बघुनि नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी उर्मी उठते
सुखदु:खाची जेथे सारखी
प्रीत जीवना ओढ लागते ||

गायक: सुमन कल्याणपुर
संगीत: वसंत प्रभू
गीत: पी. सावळाराम






( Jithe Sagara Dharani milate tithe tuzi mi waat pahate - P Sawalaram )