Friday, September 9, 2011

कसे सरतील सये - संदीप खरे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे ?
सरताना आणि सांग सलतील ना !
गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना ! .....

पावसाच्या धारा धारा ..... मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे .....
ओठभर हसे हसे..... उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे ?
आता जरा अळिमिळी
तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना ! .....

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचूप ..... सुनसान दिवा !
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा !!
चांदण्याचे कोटी कण
आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना ! .....

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर ..... काचभर तडा !
तूच तूच ..... तुझ्या तुझ्या ..... तुझी तुझी ..... तुझे तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा !! -
पडे माझ्या वाटेतून
आणि मग काट्यातून
- जातानाही पायभर मखमल ना ! .....

आता नाही बोलायाचे ..... जरा जरा जगायाचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत ..... विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले !!
जरा घन झुरू दे ना
वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! .....

गीत : संदीप खरे संगीत : संदीप खरे स्वर : संदीप खरे

Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Kase sartil saye - Sandip Khare )

2 comments:

  1. कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
    चिडीचूप ..... सुनसान दिवा !
    आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
    नभातून गोरा चांदवा !!
    चांदण्याचे कोटी कण
    आठवांचे ओले सण
    रोज रोज नीजभर भरतील ना ! ..... -

    khup sundar kalpana.... "आठवांचे ओले सण"...... apratim...!!!!!

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.