Sunday, January 30, 2011

वद जाऊ कुणाला शरण

( ऑडीओ सहित )
वद जाऊ कुणाला शरण

वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे
मी धरीन चरण त्याचे, अग सखये मी धरीन चरण त्याचे ।। 1 ।।

बहु आप्त बंधु बांधवा, आर्थिले कथुनी दु:ख मनीचे
ते होय विफल साचे, अग सखयो मी धरीन चरण त्याचे ।। 2 ।।

मम तात जननी मात्र ती, बघुनि कष्ट हाल इचे
नचलेचि काही त्यांचे, अग सखचे मी धरीन चरण त्याचे ।। 3 ।।

जे कर जोडुनि मजपुढे, नाचले थवे यादवांचे
प्रतिकूल होती साचे, अग सखये मी धरीन चरण त्याचे ।। 4 ।।

गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - बालगंधर्व




( vad jaau kunala sharan ga - Annasaheb Kirloskar )

1 comment:

Please comment. Your review is very important for me.