( ऑडीओ - सहित )
स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा
रेखाकृती सुखाच्या, चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरुन गेल्या
कधी सोशिला उन्हाळा कधी लाभला विसावा
स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा
नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजूनी, प्रीती फुलोनी यावी
काट्याविना न हाती, केव्हा गुलाब यावा
स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा
गीत - म. पा भावे
संगीत - अनिल-अरुण
स्वर - आशा भोसले
( Swapnatalya kalyanno umalu nakach kevha - M. P. Bhave )
No comments:
Post a Comment
Please comment. Your review is very important for me.