( रवींद्र नाथ ठाकूर यांच्या कवितेचा स्वैर भावानुवाद )
अथांग निळ्या आकाशातून
उठताहेत शांती च्या लाटा .
अन करून पानांचे पेले
झाडांनी , अडविल्या सूर्य किरणांच्या वाटा.
दमट हिरवळीवर जाणवताहेत
या चेतन सृष्टी चे उश्वास .
अरे ! युगानुयुगे मीच तर
जगतोय , अनुभवतोय .........
होय ! अनादी काला पासून
चालूच आहे हा माझा प्रवास
( Anadi - Translation of a poem by Ravindranath Tagore - translation by Sudhir Bhide )
No comments:
Post a Comment
Please comment. Your review is very important for me.