Saturday, December 11, 2010

मला हे दत्तगुरु दिसले - जगदीश खेबुडकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरु दिसले

माय उभी ही गाय होऊनी,
पुढे वासरु पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे, पायावर झुकले

चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु, स्वानंदे फिरले

तुम्हीच केली सारी किमया,
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर वसले

गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - सुधीर फडके
गायिका - आशा भोसले






( Mala he datta guru disale)

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.