( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले
ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले
लोक भेटायास आले, काढत्या पायासवे
अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले
गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
गायक - आशा भोसले
गायक - रवींद्र साठे
( Bhogale je dukh tyala, sukh mhanave lagale )
प्रिय शंतनू यांस,
ReplyDeleteआत्ता मी आपल्या साईटवर " भोगले ते दुःख ..." हे कै. सुरेश भट यांचे अजरामर गीत ऐकले.आपले आभार कोणत्या शब्दात मानावे हेच कळेनासे झाले आहे.एक नम्र सूचना करतो.आपण जे गीत सादर करता, तेव्हा कवी आणि गायक यांचा उल्लेख करता. पण संगीतदिग्दर्शकाचे नाव का नसते, हे समजत नाही. यापुढे ही उणीव भरून काढावी. अन्यथा तुमचा हा प्रयत्न शतशः अभिनंदनीय आहे.
मंगेश नाबर