Wednesday, February 24, 2010

सागरा प्राण तळमळला - वि. दा. सावरकर

ऒडीओ - व्हीडीओ
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धूतां
मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊं
सृष्टिची विविधता पाहूं
तइं जननीहृद् विरहशंकितही झाले
परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनीं मी
जगदनुभवयोगें बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणीं मी
येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला
सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहुं यापुढती
दशदिशा तमोमय होती
गुणसुमनें मी वेचियली या भावें
की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा
हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे
नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आतां रे
फुलबाग मला, हाय पारखा झाला
सागरा प्राण तळमळला ॥ २
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज परी साचा
वनवास तिचा जरी वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे
बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते, जी सरिता रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा प्राण तळमळला ||3||

या फेनमिषे हससि निर्दया कैसा
का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते
भिऊनि का आन्ग्लाभूमिता
मम मातेला अबल म्हणुनी फसवीसी
मज विवासनाते देशी
तरी आंग्लभूमी भयभीता रे
अबला नं माझी ही माता रे
कथिल हे अगस्तीस आता रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा प्राण तळमळला ||4||

मूळ चालीतील गाणं - चाल : हृदयनाथ मंगेशकर



वीर सावरकर चित्रपटातील गाणं - चाल : सुधीर फडके

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.