एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो
तेव्हा खरे तर गाभारयाताच भर पडत असते
की कोणीतरी आपआपल्या पुरत्या सत्याशी का होइना
पण प्रामाणिक पणे चिकटून राहील्याच्या पुण्याइची !
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळा बाहेर येण्याची !
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो
तेव्हा कोऱ्या नाजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हाल चाली, भाविकांच्या जात्रा.......
कोणितरी स्वतःचे ओझे , स्वतःच्या पायांवर
सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच !
म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित !
पण मिळते अकंठ समाधान एक सहकारी लाभल्याच
देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, "दर्शन देत जा अधून मधून...............
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना !"
देवळा बाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नत्वरिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
आस्तिकवातच्या भर्जरी शालित गुदमरलेल्या देवाचे.................
Jamla ki dada Post karna.. :)
ReplyDeleteGood Start Sumit!
ReplyDeleteae !!!ha sumit tujha blog ki shantanu cha ---?
ReplyDeletehv u guys chkd my blog?---if u do plz don't forget to poat ur comments---anyways ---gud --keep blogging---
Very Good
ReplyDeleteAn eternal truth !
ReplyDelete